चाळीसगावात अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या!

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील हरगीरबाबा नगरातील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगर येथील लक्ष्मण संजय पवार (वय-१६) या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना आज दुपारी २:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचणामा करण्यात आले आहे. दरम्यान मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.

Protected Content