मुंबई (वृत्तसंस्था) स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पार्थ लंबी रेस का घोडा है… थांबू नकोस मित्रा!’ असे ट्विट भाजपाचे नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. आमदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिले म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून? असा सवाल देखील निलेश राणे यांनी पवारांना केला आहे. तर नितेश राणे यांनी पार्थ पवार यांचे कौतुक केले आहे. आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है… थांबू नकोस मित्रा!’ असे ट्विट नितेश यांनी केले आहे. दरम्यान, पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत आपली भूमिका महाविकास आघाडी सरकारसोबत नसल्याचे कृतीतून दाखवून दिले अक़्हे. पार्थ यांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, जय श्रीराम म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजनाचे उघडपणे समर्थन केले होते.