नागपुरात दुकानदारांसह कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक ; तुकाराम मुंडेंचे आदेश

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात दुकानदारांसह कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

 

 

नागपुरात रुग्णांचा आकडा ११ हजारच्या उंबरठ्यावर आहे. तर कोरोना बळींची संख्या ४०० पार गेल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणासाठी शहरातील सर्व दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच कोरोना चाचणी करुन चाचणीचे प्रमाणपत्र दुकानात ठेवायचे आहे. ज्या दुकानादराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसणार, त्यांच्यावर नागपूर महानगरपालीका कारवाई करणार आहे. दरम्यान, नागपूर शहरात साधारण ३० हजार दुकाने आहेत. ७० ते ८० हजार दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे.

Protected Content