मागील २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित रुग्ण वाढले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर ९४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा २३ लाख ९६ हजार ६३८ झाला आहे. गेल्या २४ तासांत रेकॉर्डब्रेक ६६ हजार ९९९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ही सर्वाधिक रुग्णांची आकडेवारी आहे. याआधी ८ ऑगस्ट रोजी ६५ हजार १५६ नवी रुग्ण सापडले होते. तर, एका दिवसात ९४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६ लाख ५३ हजार ६२२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत ४७ हजार ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

Protected Content