पारोळ्यात सोमवारपासून शासकीय कापूस खरेदी तात्पुरती बंद

parola1

पारोळा, प्रतिनिधी । सीसीआय अंतर्गत पणन महामंडळ वतीने पारोळ्यात कापूस खरेदी ही करण्यात येत आहे. ती २ मार्चपासून तात्पुरता स्वरूपात बंद ठेवण्यात येत असल्याचे पत्र कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक, जळगाव यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहे.त्यामुळे ही खरेदी पुन्हा कधी सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून तीन ठिकाणी कापूस खरेदी ही करण्यात येत आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची आवक सध्या सुरू आहे. वाढत्या आवकेमुळे अनेकदा वाद-विवाद केंद्रांवर व कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात होत आहेत. या तिन्हीं खरेदी केंद्रांवर कापूस व गाठी साठल्याने जागा अभावी खरेदी बंदचा निर्णय तात्पुरता सुरुवात घ्यावा लागला असल्याची माहिती पुढे येत आहे. बाजारात सध्या कापसाचे भाव हे कमी झाले आहेत. त्यामुळे थांबलेला शेतकरी हा या केंद्राकडे अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे खरेदी केंद्रासह बाजार समितीमध्ये शेकडो वाहनांच्या रांगाचे चित्र दिसून येत आहे. अनेकदा वाहतुकीला अडथळा येऊन ती खोळंबत आहे. तात्पुरता ही खरेदी बंद करण्यात आली असली तरी ती केव्हा सुरू होईल याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कापूस ही खरेदी केंद्र सुरू न झाल्यास कापसाचे भाव बाजारात अजून मोठ्या प्रमाणात कमी होतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

Protected Content