पारोळा, प्रतिनिधी । भारतीय जनतापार्टीकडून तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले . भाजपचा विश्वासघात करून काँगेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले.
सरसकट कर्जमाफी करू,सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. हा आघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाचा आशय असा की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मदतीची पिक कर्ज माफ केली आहेत केवळ पिक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहुसंख्य शेतक-यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. तूर खरेदीचे निकष जाणीवपूर्वक बदलण्यात आल्यामुळे जेथे २०१७-१८ मध्ये प्रती हेक्टरी १४.५ क्विंटल खरेदी होत होती. तेथे आता २०१९-२० मध्ये केवळ ८.४६ प्रती हेक्टरी इतकीच खरेदी होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर हे प्रमाण ३.६ क्विंटल इतके कमी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टीने निवेदनाद्वारे तीव्र निषेध केला आहे. तहसीलदार गावंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्याचे माजी खासदार ए. टी. पाटील व माजी नगराध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, भाजपा तालुकाप्रमुख अतुल मोरे, रविंद्र पाटील, मुकुंदा चौधरी, सचिन गुजराती, सुनील अभिमान पाटील, यशवंत भाऊराव पाटील, किशोर देवराम पाटील, मयूर हिरालाल पाटील, प्रकाश देवराम पाटील, आप्पा जनार्दन पाटील, नाना बळीराम चौधरी, विजय दिलीप जगताप व पारोळा पोलीस स्टेशन बंदोबस्त करतांना पोलीस निरीक्षक लीलाधर कानडी, एपीआय निलेश गायकवाड सहकार्य पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यासह सर्व पोलीस बांधव उपस्थित होते.