एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल-पारोळा मतदार संघाच्या विधानसभा निवडणूकीत डॉ.संभाजीराजे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मतदार संघातील नागरीकांशी संवाद साधत आहे. त्यांनी साधलेल्या संवादाला नागरीकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे व त्यालाच समाजसेवा समजणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ.संभाजीराजे पाटील यांना ओळखले जाते. गेल्या दोन ते अडीच वर्षांत त्यांनी मतदार संघात चांगला संपर्क ठेवला असून दोन तालुके व एका जिल्हापरिषद गटात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत डॉ. संभाजीराजे फाउंडेशनच्या मार्फत असंख्य मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत केले. कोरोना काळातही त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनतेची सेवा केली आहे.