स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तरी अमळनेर तालुक्याचा शाश्वत विकास होईल का ?

अमळनेर, प्रतिनिधी | देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स साजरा करत असतांना अद्यापही शाश्वत सिंचनापासून वंचित असणाऱ्या अमळनेर तालुक्यासाठी मनापासून निधी आणणार का ? असा प्रश्न मारवड गोवर्धन येथील शेतकऱ्यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.

 

 

निवेदनाचा आशय असा की, भारताला स्वतंत्र मिळाल्यापासून ते आजपर्यंत अमळनेर तालुक्यात बारमाही शाश्वत सिंचन व्यवस्था कोणीच केली नाही? अमळनेर तालुका हा कायम बारमाही शाश्वत सिंचनापासून उपेक्षित दुर्लक्षित राहिला आहे ? आजपर्यंत ७५ वर्षात ( स्वर्ण महोत्सवी वर्ष ) या तालुक्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सिंचनासाठी नेहमी दुजाभाव केला आहे. अमळनेर तालुक्याला मुद्दाम दुर्लक्षित ठेवले आहे. आणि म्हणुन अमळनेर तालुका विकासापासुन कोसो दुर राहिला आहे. शाश्वत सिंचनच्या अभावमुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. शाश्वत सिंचनाबरोबरच येथे कोणताच मोठा उद्दोग किंवा मोठी कारखानदारी नसल्यामुळे अमळनेर तालुक्यातील तरुणांना रोजगार, कामधंदा, नोकरी नसल्याने हताशपणे करीत आहेत. परीणाम स्वरुप आशा तरुणांना मुलगीवाले मुली देत नाहीत व त्यांची लग्नेसुध्दा होत नाहीत म्हणुन की काय तरुण वर्ग व्यास्नाधीतेकडे वळत आहे. जर आपणास खरोखर मनापासुन या उपेक्षित अमळनेर तालुक्यातील जनतेवर प्रेम असेल तर आपण या विकासापासून कोसो दुर असले अमळनेर तालुक्यातील एकमेव जीवनदायी प्रकल्प शाश्वत सिंचन प्रकल्प निम्नतापी ( पाडळसरे धरण ) पुर्ण करणेसाठी प्रामाणिकपणे मनापासुन प्रयत्न करावे. यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माद्दमातुन अंदाजे 4000 ( चार हजार ) कोटी रुपये एकरकमी ताबोडतोब मिळवून द्यावेत. जर आपण आमचे ( एवढेजरी काम केले तरी आपणास हजारो लोकांचा आशिर्वाद निश्चीतच मिळेल यात शंका नसावी.) शाश्वत सिंचनापासून उपेक्षित असलेल्या अमळनेर तालुक्यासाठी आपण खरोखर मनापासून निधी आणणार का ? तालुक्यासाठी केंद्र ब राज्य शासनाने सिंचनासाठी नेहमी दुजाभाव केला आहे. अमळनेर तालुक्याला मुद्दाम दुर्लक्षित ठेवल्याने तालुका विकासापासुन कोसो दुर राहिला आहे.

Protected Content