परिवहनच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करा-अमोल कोल्हे

जळगाव प्रतिनिधी । राज्य परिवहन विभागाच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी अमोल कोल्हे यांनी केली असून त्यांनी याबाबतचे निवेदन राज्यपालांना पाठविले आहे.

याबाबत वृत्त असे की, परिवहन खात्यातील अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह इतर सहा अधिकार्‍यांविरोधात ३०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. याच तक्रारीबाबत आता जळगावातील सामाजिक कार्यकर्ते अमोल कोल्हे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून याची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ही तक्रार परिवहन मंत्री, इतर महत्त्वपूर्ण अधिकार्‍यांच्या विरोधात असल्याने राज्य शासन या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी करण्याची शक्यता नसल्याने या प्रकरणाची सीबीआय, ईडी या केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, असे अमोल कोल्हे यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Protected Content