पारोळा येथे सुयोग गॅसतर्फे कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप

पारोळा प्रतिनिधी । येथील सुयोग गॅस एजन्सीच्या वतीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये जनजागृती आणि कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मास्क आणि सनिटायझर वाटप करण्यात आले.

सुयोग गॅस एजन्सीच्या वतीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरवर डेटॉल फवारणी करून निर्जंतुकीकरण २२ मार्च रोजी सरकारद्वारा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. परंतु गॅस व्यवसाय अत्यावश्यक सेवा असल्या कारणाने एजन्सीचे सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि सनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच कोरोना प्रादुर्भाव टाळता यावा या करिता घरपोच वाटप करण्यात येणाऱ्या सगळ्या सिलेंडरवर डेटॉलची फवारणी करण्यात आली. तसेच कोरोना जनजागृती करीता सगळ्या कर्मचाऱ्यांना, तसेच येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकला कोरोना बाबत माहीत देण्यात येत आहे. या करिता दुकानाच्या तसेच गोडाऊनच्या जागेवर ठिकठिकानी माहिती पत्रक चिटकविण्यात आले आहे. एजन्सी कर्मचाऱ्यांमधील सजगता बघून समाजातील विविध स्थरातून एजन्सीचे कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content