पारोळा येथे विना मास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिका व पोलिसांची संयुक्त दंडात्मक कारवाई

 

पारोळा, प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच प्लास्टिक वापरणारे व अतिक्रमित भाजी विक्रेत यांच्यावर कारवाई करण्यात आली.

नगरपालिका व पारोळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी आज शहरात विना मास, प्लास्टिक बंदी, अतिक्रमित भाजी विक्रेते यांच्यावर दोन पथकांद्वारे संयुक्त कार्यवाही केली. यात मास्क न वापरणाऱ्या ९ व्यक्तींकडून दंड आकारण्यात आला. तसेच प्लास्टिक बंदी असतांना प्लॅस्टिक वापरणाऱ्यांकडून देखील दंड आकारून ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. या पथकांनी अतिक्रमित लोट गाड्या वर देखील कार्यवाही केली असून मुख्य बाजारात होणारी गर्दी आटोक्यात आणली. ही कारवाई पथक प्रमुख कार्यालय अधीक्षक संघमित्रा संगमित्रा संधानशिव , कर निरीक्षक संदीप साळुंखे, आरोग्य निरीक्षक टी. डी. नरवाडे, चंद्रकांत महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल महिंद्र मराठे ,एच. एम. पाटील, किशोर चौधरी, सचिन चौधरी, किरण खंडारे आदींच्या पथकाने केली.

Protected Content