पारोळा प्रतिनिधी । कोरोना विषाणू संचारबंदी काळात अन्नदान समितीस येथील श्री. बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष यु.एच. करोडपती यांनी ५ हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे.
येथील श्री.बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यु. एच.करोडपती यांनी कोरोना विषाणू संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू व्यक्तीना २ वेळेचे जेवण उपलब्ध यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्या निवृत्ती वेतनातून श्री बालाजी महाप्रसाद समितीत रुपये ५ हजार वैयक्तिक मदत करुन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांनी दिलेल्या योगदानाला बालाजी महाप्रसाद समितीने आभार व्यक्त केलेत.