जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशकांची पदांची भरती

tata

tataक

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमांकरिता शिल्पनिदेशकांची पदे तासिका तत्वावर अगदी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याचे आर. पी. पगारे, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी कळविले आहे.

संस्थेत टर्नर-2 पदे, टुल ॲन्ड डायमेकर (J & F) -2, टुल ॲन्ड डायमेकर (D & M) -1, मशिनिष्ट-3, एमएमटीएम-2, ओएएमटी-1, डिझेल मेकॅनिक-2, कारपेंटर-1, वेल्डर-1, फिटर-2, इलेक्टीशियन-2, आरएसी-1, मेकॅनिक मोटार व्हेकल-2, ईलेकट्रॉनिक्स मेकॅनिक.-2, इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक-1, गणित निदेशक-1, गणित चित्रकला निदेशक-1 याप्रमाणे पदे रिक्त आहेत. या पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रामाणे आहे. संबंधित व्यवसायात आटीआय, एनसीटीव्हीटी, सीटीआय, उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा/डिग्री उत्तीर्ण तसेच किमान दोन वर्षाचा शिकविण्याचा किंवा औद्योगिक आस्थापनेतील अनुभव.

पात्रताधारक इुच्छक उमेदवारांनी WWW.dvet.gov.in या वेबसाईटवर Visiting Faculty मध्ये जावुन ऑनलाईन नोंदणी करुन अर्ज सादर करावेत. नंतर या अर्जाची प्रत या कार्यालयास सादर करावयाची आहे. अंतिम मुदत 13 सप्टेंबर, 2019 असुन दिनांक 16 सप्टेंबर, 2019 नंतर प्रात्याक्षिक परिक्षा व मुलाखत घेवुनच निवड करुन त्वरीत नेमणुक देण्यात येणार आहेत. तसेच यापुर्वी संस्थेत सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. पगारे यांनी केले आहे.

Protected Content