भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सुहास हॉटेल समोरील पान टपरी धारकाला शिवीगाळ व धमकीत दुकानातून १२ हजारांची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी रात्री ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुपेश विलास वाघ वय-२५, रा. आनंदनगर हा तरुण आपला कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याची भुसावळ शहरातील सुहास हॉटेल समोरील शिरपूर कन्हाळा रोडवरील पानटपरी आहे. पानटपरी चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता तो पानटपरीवर असताना त्या दुकानावर आकाश पारधे रा. वाल्मिक नगर आणि आनंद सारवाल रा. अकलूज ता. भुसावळ हे दोघे जण पानटपरी आले. त्यांनी काही कारण नसताना शिवीगाळ करत धमकी देऊन रुपेश वाघ यांच्या खिशातील १२ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकारून स्काउन चोरून नेली ही घटना घडल्यानंतर मंगळवारी ७ मे रोजी रात्री ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकाश पारधे रा. वाल्मिक नगर आणि आनंद सारवाल रा. अकलूज ता. भुसावळ या दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. निलेश चौधरी हे करीत आहे.