जळगावात दुकान फोडले ; दीड लाखाचा ऐवज लंपास

ec7cf8f0 6ca6 44c4 8bdb 59b40d36ce89

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समीतीजवळ असलेले सुरेशदादा जैन कॉम्पलेक्समधील एक दुकान फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी साधारण दीड लाखाचा ऐवज लंपास केला असून या प्रकरणी आज एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

 

कमलेश विकास घ्यार (वय 25 वर्ष, रा, प्लॅट नं. 202, अंजनी क्लासीक, जगवाणी नगर, एम.आय.डी.सी) यांचे कृषी उत्पन्न बाजार समीतीजवळ असलेले सुरेशदादा जैन कॉम्पलेक्समध्ये कन्हैय्या मोबाईल नावाचे दुकान आहे. या दुकानात घ्यार हे मोबाईल विक्रीसह स्टेट बँक ऑफ इंडीया व एअरटेल पेमेंट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवितात. घ्यार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 01 जुलै रोजी सकाळी नेहमी प्रमाणे 09:30 वाजेच्या सुमारास त्यांचे मेहुणे शशीकांत पाटील यांनी दुकान उघडले होते. दिवसभर त्यांनी ग्राहकांचे पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. त्यादिवशी प्रकृती अस्वस्थ असल्याने ते दुकानावर गेले नव्हते. रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मेहुणे शशीकांत पाटील यांनी फोन करुन घ्यारे यांना विचारले की, आजचे जमा झालेले व्यवहाराचे पैसे घेवून जाताय का? परंतु तब्येत बरी नसल्यामुळे सदरचे पैसे तेथेच दुकानात असलेल्या काऊंटरमध्ये ठेवण्यासा सांगीतले होते. त्यानंतर शशीकांत पाटील हे दुकान व्यवस्थीत बंद करुन घरी निघुन गेले.

 

दुसऱ्या दिवशी दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास शालक निलेश पुष्कर याने फोनद्वारे घ्यारे यांना कळविले की, दुकान हे अर्धवट उघडे आहे. त्यामुळे घ्यारे हे लागलीच दुकानावर गेल असता दुकान हे अर्धवट उघडे दिसून आले. शटर वाकलेले होते. दुकानात प्रवेश करुन दुकानात गेलो असता मला दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. दुकानात लावलेले सी.सी.टी.व्ही फुटेज बघितले असता. निर्दशनास आले की, दिनांक 02 जुलै रोजी पहाटे 4.54 वाजेच्या सुमारास 3 ते 4 इसम हे तोंडाला रुमाला बांधुन दुकानाचे शटर उचकवुन दुकानात प्रवेश करतांना दिसत आहे. चोरट्यांनी दुकानातून 1 लाख 22 हजार 500 रुपये रोख, 5,900 किंमतीचा लावा कंपनीचा मोबाईल, 8,000 रुपयाचा MI कंपनीचा REDMI 4 मोबाईल, असा एकूण 1 लाख 36 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात कमलेश घ्यार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ३ ते ४ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल्क करण्यात आला आहे.

Protected Content