जि. प. सदस्य दिलीप पाटील यांना अपात्र करा ; काँग्रेसची याचिका दाखल

जळगाव, प्रतिनिधी । येथील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता दि ३ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत जि. प. सदस्य दिलीप युवराज पाटील यांनी पक्षाचा आदेश न पाळल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस तथा आमदार मोहन जोशी यांच्या आदेशानुसार काल दि. ४ रोजी काँग्रेस चे गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे.

दि. ३ जानेवारी रोजी जळगाव जि. प. चे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकी संदर्भात दि. ३० डिसेंबर २०१९ रोजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी भारतीय काँग्रेस पक्षाच्या सर्व जि. प. सदस्यांना मिटींगला न चुकता हजर राहून अध्यक्ष पदाकरीता रेखा दिलीपसिंग राजपुत व उपाध्यक्ष पदाकरीता जयश्री अनिल पाटील यांना मतदान करणेबाबत पक्षादेश दिलेला होता. मात्र या मिटींगला जि.प. सदस्य दिलीप युवराज पाटील यांनी जाणिवपुर्वक विरोधात मतदान केले. तशी चित्रफीत पक्षाकडे आहे व त्यांनी पक्षादेश झुगारलेला आहे. त्यांचे सदरचे कृत्य हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने क्षमापीत केलेले नाही. तसे त्यांना देखील कळविलेले आहे. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८७चे नियम ३ (५)नुसार त्यांच्यावर अपात्रतेसंदर्भात कार्यवाही व्हावी असे पत्र जिल्हाधिकारी यांना प्रभाकर सोनवणे यांनी दिले आहे.

Protected Content