पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा नगरपरिषद संचलित महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयातर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील हुतात्मा स्मारकात दि. १ डिसेंबर ते दि. ६ डिसेंबर या कालावधीत रात्री ८ वाजेपासून शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सलग सहा दिवस चालणाऱ्या शारदीय व्याख्यानमालेत दि. १ डिसेंबर रोजी सांगली येथील प्रा. अजितकुमार कोष्टी “हसवणुक” या विषयावर तर दि. २ डिसेंबर रोजी मुंबई येथील सुरेश सावंत “भारतीय संविधानातील मुल्ये आणि आजची आव्हाणे, दि. ३ डिसेंबर रोजी ठाणे येथील डॉ. नेहा वैद्य “झाशीच्या राणीच्या पराक्रमाची यशोगाथा पराक्रमाची ज्योत”, दि. ४ डिसेंबर रोजी सोलापुर येथील सरफराज अहमद “भारतीय इतिहास’, दि. ५ डिसेंबर रोजी धुळे येथील नाजनिन शेख गझल गृप “गझल गायन” व दि. ६ डिसेंबर रोजी वृषभ आकिवाटे हे “हास्यगंध” अस्सल मराठी लाफ्टर शो बिनधास्त मनमुराद खळखळुन हसा” या विषयांवर आधारित शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असुन या ६ दिवस चालणाऱ्या शारदीय व्याख्यानमालेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांचेसह सर्व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.