पर्यावरण पूरक गणेश उत्सवासाठी पालिकेचा पुढाकार : जळगावकरांसाठी स्पर्धेचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महानगरपालिका हद्दीतील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांकरिता माझी वसुंधरा ३. ० अभियानांतर्गत  महानगरपालिका जळगाव सार्वजनिक गणेशोत्सव २०२२  पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धत जास्तीत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

राज्य शासन पुरस्कृत माझी वसुंधरा ३. ० अभियानांतर्गत  जळगाव शहर हद्दी मधील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांकरिता महानगरपालिका जळगाव सार्वजनिक गणेशोत्सव २०२२  पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित कण्यात आली आहे. यात पर्यावरण पूरक मूर्ती स्थापना व आरास या विषयाकरता स्पर्धा घेण्यात येणार आहे.  या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आपल्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची माहिती फोटोज अथवा व्हिडिओ स्वरूपात दि.  १६ सप्टेबरपर्यंत सादर करावयाची आहे. अधिक माहितीसाठी पर्यावरण विभागाचे अभियंता योगेश वाणी यांच्या  97 64 18 49 76 क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे आपले संपूर्ण नाव व संपर्क आदी सोबत पाठवण्यात यावी.  स्पर्धेत सहभागी सर्वांना प्रशस्तीपत्र व विजेत्यास पारितोषिक देण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने महापौर जयश्रीताई महाजन,. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड ,उपमहापौर कुलभूषण  पाटील यांच्यावतीने जळगाव शहरातील समस्त नागरिकांना व सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे.

Protected Content