बेंडाळे महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षां निमित्ताने ” जल्लोष 2022-23 ” या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन महाविद्यालया च्या प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते आज रोजी संपन्न झाले.

स्वातंत्र्यच्या अमृत मोहोत्सवा निमित्ताने जल्लोष 2022-23 वार्षिक स्नेहसमेलनाला डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात चार दिवस चालणाऱ्या स्नेहसंमेलनात विद्यर्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच स्वतःमधील आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. यात संगीत खुर्ची स्पर्धा, फनी गेम्स स्पर्धा, तीन पायांची शर्यत, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, पोस्टर स्पर्धामध्ये मोठ्या संख्येने विद्यर्थिनीनी सहभाग नोंदवला. यात प्रमुख आकर्षण असलेले ‘ब्युफा पेजेन्ट’ फॅशन शो रविवारी होणार आहे.

आज पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटातून एक व दोन क्रमांक मिळवनाऱ्या विद्यर्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. व्ही. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे, स्नेह संमेलन प्रमुख प्रा. आर. ऐन. महाजन, कला मंडळप्रमुख डॉ. सत्यजित साळवे, डॉ. सुजाता गायकवाड, प्रा. योगेश खैरनार, प्रा. राज गुंगे, डॉ. सविता नंदनवार , आदींची उपस्थिती होती. स्नेहसंमेलन निमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा व त्या स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

विजयी स्पर्धक आणि नावे –
1. संगीत खुर्ची स्पर्धा:
कनिष्ट महाविद्यालय गट: निकिता राजेंद्र पाटील ( प्रथम), जान्हवी राजेंद्र सपकाळे (द्वितीय), कृष्णालि मिलिंद चांदेकर (तृतीय)
वरीष्ठ महाविद्यालय गट: लीना संजय पाटील ( प्रथम), वैष्णवि विलास पवार ( द्वितीय), आरती ममराज पवार ( तृतीय)
2. फनी गेम्स स्पर्धा:
कनिष्ट महाविद्यालय गट: धनश्री सुनील पाटील (प्रथम), अश्विनी विष्णु काळे (द्वितीय)
वरीष्ठ महाविद्यालय गट:
सरला रविन्द्र aswar (प्रथम), अश्विनी अनिल vandole ( द्वितीय)
3. तीन पायांची शर्यत:
कनिष्ट महाविद्यालय गट: काजल पाटील-चित्रलेखा सोनवणे ( प्रथम),
सुहानी प्रमोद पाटोळे-उर्मिला भागवत पाटील ( द्वितीय)
वरीष्ठ महाविद्यालय गट: स्वाती राजू पाटील- पूजा गोपाळ पाटील ( प्रथम), यामिनी पाटील- अनुष्का चालसे ( द्वितीय)
4. वक्तृत्व स्पर्धा:
कनिष्ट महाविद्यालय गट: प्रिया परिहार ( प्रथम)
वरीष्ठ महाविद्यालय गट: प्राजक्ता राजेंद्र राठोड ( प्रथम), दीप्ती कमलाकर पाटील ( द्वितीय), राणी चव्हाण (तृतीय)
परीक्षक: डॉ. रुपाली चौधरी, प्रा. मोईन शेख.
5. वादविवाद स्पर्धा:
वरीष्ठ महाविद्यालय गट: भावना राजू राणे- वैष्णवि संतोष वाणी ( प्रथम),
आलिशा अश्रफ तेली- कामाक्षा पांडुरंग महाजन ( द्वितीय)
परीक्षक: प्रा. दीपक पवार, डॉ. रुपाली चौधरी.
6. व्यंगचित्र स्पर्धा:
कनिष्ठ गट: लक्ष्मी राजेश सिंग (प्रथम ), भाग्यश्री कैलास सनेर (द्वितीय)
वरीष्ठ गट: दीपमाला नितीन बेलदार (प्रथम), ऋतुजा शिवाजी गव्हारे ( द्वितीय)
7. पोस्टर स्पर्धा:
कनिष्ठ गट: वैष्णवी कोळी ( प्रथम),भूमिका प्रशांत कमलाकर ( द्वितीय)
वरीष्ठ गट: ऋतुजा गवारे (प्रथम), कोयल कमलाकर कोळी ( द्वितीय).

Protected Content