शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वाडी शेतकऱ्याला न्याय मिळण्यासह रस्त्यांचे कामाच्या चौकशी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील वाडी येथील शेतकऱ्यांची कापूस व्यापाऱ्यांकडून सन – २०२२ मधे ८४ लाखाची फसवणूक झाल्याने त्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, शेतकरी फसवणूक सन्मान निधी स्थापन करणे, अंतुर्ली, लोहटार, नाचणखेडा, बाळद, नगरदेवळा रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्याची चौकशी करणे, शासनाने घरकुलांसाठी अनुदान वाढवून देणे, शेतरस्त्यासाठी शासनाकडून असलेल्या जाचक अटी रद्द करणे, पाचोरा ते अंतुर्ली व भातखंडे खुर्द दरम्यान रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे केलेले काम अदोष असल्याने त्या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने पावसाळ्यात नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने त्या कामांची चौकशी करणे, पावसाळ्यात गिरणा नदीपात्रात अचानक आलेल्या पुरात भातखंडे खु” गावातील शेतकऱ्यांची गुरे वाहून गेले त्याचे मोठे नुकसान झाले मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही ती त्वरित मिळावी, शासकीय दवाखान्यात औषधींचा तुटवडा असल्याने मुबलक औषधे पुरवणे, जळगाव ते चांदवड महामार्गाचे ठिकठिकाणी काम अपूर्ण असल्याने ते त्वरित पूर्ण करणे, अशा विविध मागण्यासाठी “जगा आणि जगू द्या” विकासमंचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव भूषण वानखेडे यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

Protected Content