दुचाकी चोरीतील पाहिजे असलेला गुन्हेगाराला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दुचाकी चोरीतील गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील धामणगाव येथून रविवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. त्याच्यावर शहर पोलीस ठाणे आणि तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आणि शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिपक भास्कर सपकाळे (वय-२७) रा. धामणगाव ता.जि.जळगाव याने दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार केले. या पथकात पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पो.ना. नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे यांनी कारवाईसाठी रवाना केले. पथकाने रविवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता धामणगावातून संशयित आरोपी दिपक भास्कर सपकाळे याला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी साथिदार ईश्वर जगन्नाथ सपकाळे रा. धामणगाव ता.जि.जळगाव याच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपी दिपक सपकाळे याला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content