पाचोऱ्यात विविध मागण्यांसाठी एलआयसी एजंटांचे धरणे आंदोलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील एल. आय. सी. शाखेत विमाधारक व एल. आय. सी. एजंटांचे विविध मागण्यांसाठी एजंटनी धरणे आंदोलन केले.

 

सोमवार दि.५ सप्टेंवर रोजी  विमाधारक व एल. आय. सी. एजंट यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे दिवसभरात एकही नविन प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. तसच जुन्या पॉलिसीचे हप्ता भरणे बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला. यात जेष्ठ एल. आय. सी. एजंट प्रा. रमाकांत शर्मा,  प्रकाश पाटील, एम. डी. पाटील, नितीन मोराणकर, विनायक दिवटे, सुनिल पाटील, सुनील देवरे, विजय पाटील, अनिल कोतकर, सुजित तिवारी,अरुण पाटील, देविदास कोळी सह पाचोरा व भडगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने एजंट सामिल झाले होते.

ज्ञज्ञविमा प्रतिनिधींनी विमाधारकांसाठी विमा धारकांचे बोनस वाढवावे.  कर्ज व इतर देवाण घेवाण करीत असतांना त्यावरील व्याजदर कमी करावा.  पाच वर्षे बंद असलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची पद्धत सुरू करावी.  गोरगरीब व अशिक्षित आणि तळागाळातील विमाधारकांकडून के. वाय. सी. घेणे सक्तीचे करु नये.‌ याशिवाय विमा प्रतिनिधींसाठी ग्रॉज्युटी वाढवून ती २० लाख रुपये करावी. सर्व प्रतिनिधींसाठी मोफत उपचारासाठीची योजना सुरू करावी. विमा प्रतिनिधींसाठी टर्म इन्शुरन्स वाढवून द्यावा, अंशदायी पेन्शन व अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना सुरू करावी, यासह अनेक मागण्यांसाठी घोषणाबाजी देत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

Protected Content