पुतळा विटम्बनाची ” ती ” अफवाच

 

 

अमळनेर : प्रतिनिधी । तालुक्यातील खवशी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी पसरली आणि प्रशासन सज्ज झाले मात्र लहान मुलांच्या खेळण्यातून हा प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर ती अफवा ठरली आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला

तालुक्यातील खवशी येथे अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले गावकरी दक्ष झाले त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, शरद पाटील , पातोंडा आऊट पोस्टचे सुनील पाटील घटनास्थळी हजर झाले

घटनस्थळजवळ गुरे ढोरे बांधत असल्याने तेथे चिखल होता त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्यातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलीस निरीक्षक मोरे यांनी विधिवत पूजा करून पुतळा धुतला आणि आजूबाजूची सफाई केली त्यांनतर पुतळ्याच्या आजूबाजूला गुरे बांधण्यास बंदी घालण्यात आली. यावेळी राहुल पवार , रोहिदास कापडे , कैलास पाटील ,बी के सूर्यवंशी , भाया पाटील हजर होते

Protected Content