रोहिणी खडसेंवरील हल्ल्याप्रकरणी; हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

चाळीसगाव, प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जेडीसीसी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर काहींनी भ्याड हल्ला केला. या घटनेने जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, पंचायत समिती सभापती अजय पाटील, कैलास सूर्यवंशी, नगरसेवक दीपक पाटील, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले, शहराध्यक्ष शुभम पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, उपाध्यक्ष अमोल पवार, गुंजन मोटे, कुणाल पाटील, राकेश निकम, शुभम गवळे, भाऊसाहेब पाटील, सादिक सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content