केमिकल कंपनीतला गाळ उठला तिघा कामगारांच्या जीवावर

जळगाव प्रतिनिधी । सहकारी औद्योगीक वसाहतीत असलेली समृध्दी केमिकल ही कंपनी तीन दिवसानंतर उघडल्यानंतर बाहेरच्या अंडरग्राऊंड टाकीत साचलेला गाळ काढण्यासाठी तिघे कामगार गेले असतांना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे गाळ हा तिन्ही कामगारांच्या जीवावर उठल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी ३० चिंचोली या. यावल, दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि आणि मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) तिन्ही कामगार सहकारी औद्योगीक वसाहतीतल्या समृध्दी केमिकल या कंपनीत कामाला होते. तीन दिवसांपासून कंपनी बंद होती. यामुळे येथील अंडरग्राऊंड टाकीमध्ये गाळ साचला होता. हा गाळ साफ करण्याचे तिन्ही कामगारांना सांगण्यात आले होते. यानुसार त्यांनी सफाईला प्रारंभ केला. यात पहिल्यांदा दिलीप गाळात अडकला. त्याला सोडविण्यासाठी हे दोन्ही जण गेले असता ते देखील यात अडकले. यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

समृध्दी केमिकल्स ही कंपनी ऑर्गेनिक खते आणि अन्य सामग्री बनविण्यासाठी प्रसिध्द आहे. कंपनी तीन दिवस बंद असल्याने यात साचलेले पाणी आणि अन्य सामग्रीमुळे टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ निर्मित झाला असावा. याचीच सफाई करण्यासाठी हे तिन्ही कर्मचारी गेले असता त्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content