पाचोरा प्रतिनिधी । राज्याच्या अर्थसंकल्पात क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे, डॉ. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी कोणतीही तरतूद करण्यात न केल्याने आघाडी सरकारचा जळगाव जिल्ह्यातर्फे निषेध करणारे निवेदन लहूजी शक्ती सेनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे, डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली नाही. डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ या महामंडळात मातंग समाजाच्या विकासासाठी कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. याचा मातंग समाजाच्या वतीने व लहुजी शक्ती सेना जळगाव जिल्हा यांच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिलीप चंदनशिव, युवा अध्यक्ष राजू कोतकर, दिपक गायकवाड, रामनाथ शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.