पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात मोकाट गुरांचा सुळसुळाट असल्याने शहरातील एक वृद्ध बाजारात जात असतांना मोकाट गुराने वृद्धास जोरदार धडक दिल्याने वृद्ध जखमी झाला असुन त्याठिकाणी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने वृद्धाचे प्राण वाचले आहे. मात्र या मोकाट गुरांकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाचोरा शहरात दिवसेंदिवस मोकाट गुरांची संख्या वाढत असुन चौका चौकात मोकाट गुरांचे कळप बसलेले असतात. यामुळे वाहन चालवितांना चालकांना मोठी कसरत करावी लागते. व अनेकदा किरकोळ अपघात देखील घडत असतात. असाच एक प्रकार शहरातील भाजी मंडी नजीक घडला असुन जुलाल सुपडु भोई (वय – ६५) रा. श्रीराम नगर, बाहेरपुरा हे जात असतांना त्याठिकाणी असलेल्या मोकाट बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत जुलाल भोई हे जखमी झाले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अशा घटना वारंवार घडत असल्याने नगर पालिका प्रशासनाने या मोकाट गुरांचा बंदोबस्त कराव अशी मागणी शहरवासीयांकडुन जोर धरु लागली आहे