पाचोऱ्याच्या श्रेयश सोमपुरकरची चित्रकलेत भरारी

 

पाचोरा, प्रतिनिधी ! व्ही. आय. टी. भोपाल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेत वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी कॉलेजचा व रंगश्री आर्ट पाचोऱ्याचा विद्यार्थी श्रेयस सोमपूरकर याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.

असंख्य विद्यार्थ्यांमधून श्रेयसच्या चित्राची निवड झाली. स्पर्धेची थीम “बालभिक्षावृत्ती” ही होती . लहान मुलांची सुरक्षा, त्यांचे संवर्धन या संबंधी विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवावे हा या स्पर्धेचा उद्देश होता. रस्त्यावरील लहान मुलांना दान द्यावे पण.. ते पैश्याच्या स्वरूपात न देता त्यांना चांगले अन्न दयावे, शिक्षण मिळावे, उत्तम आरोग्यासोबतच आनंद मिळावा, त्यांच्याशी मैत्री होऊन त्यांना परिवाराची छाया मिळावी असा त्याच्या या चित्रातून बोध होतो.

‌श्रेयश याने इयत्ता ४ थीत रंगश्री आर्ट फाऊंडेशन, पाचोरा येथे प्रवेश मिळविला. तेव्हापासून कलेचा छंद जडला तो आजतागायत आहे. अभ्यासातही हुशार… असून १० वीत त्याला ९३ टक्के गुण मिळाले. भोपाळ युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग कॉम्पुटर सायन्समध्येही त्याने कलेचा डंका वाजविला

पेन्सिल शेडिंग मध्ये पोट्रेट, कलर पेन्सिल, व वॉटर कलर मध्ये निसर्ग चित्र यात ही त्याचा हातखंडा होता. रंगश्रीचा पहिला पेन मध्ये पोट्रेट करणारा विद्यार्थी होता. त्याने मदर तेरेसा, आनंद ऋषीजी, लोकमान्य टिळक, ए. पी. जे. अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, भारद्वाज पक्षी अशी अनेक चित्र रेखाटली आहेत.

तो लोहटार येथील एस. एस. मालपुरे शाळेतील शिक्षक महेंद्र सोमपूरकर व बुऱ्हानी इंग्लिश स्कूलच्या पर्यवेक्षिका अश्विनी सोमपूरकर यांचा सुपुत्र आहे. श्रेयस याचे सुबोध कांतायन, भारती कांतायन व रंगश्री परिवारातील अजय पाटील, वैभव शिंपी,अक्षय पाटील, श्रेयश चिंचोले, शुभम पाटील व इतर विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content