पाचोरा येथे विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वाटप

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय ग्राहक दीन पंधरवड्यात विविध शालेय स्पर्धा विजेत्यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत व महसूल विभाग पाचोरा चे वतीने पुरस्कार व प्रशस्तीपत्र वितरण सोहळा नुकताच सोहळा भडगाव रोडवरील शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार कैलास चावडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य डॉ. अनिल देशमुख, शिंदे इंटरनॅशनल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष चिंधू मोकल, उपाध्यक्ष ॲड. सचिन देशपांडे, संजय पाटील, तालुका संघटक शरद गीते, परिवहन समिती प्रमुख सुरेश तांबे, कृषी व महसूल समिती प्रमुख अरुणा उदावांत, प्रांत महिला जिल्हा प्रतिनिधी व महिला संघटक निर्मला देशमुख, शिक्षण समिती प्रमुख सुधाकर पाटील, जिल्हा कृषी समिती प्रमुख एन. आर. पाटील, भडगांव तालुका सचिव निलेश बडगुजर, महिला प्रतिनिधी प्रतिभा पाटील, रोहिणी पाटील, तालुका पुरवठा अधिकारी पुनम थोरात, सहायक पुरवठा अधिकारी अभिजित येवले, शिव पाटील हे देखील उपस्थित होते.

 

राष्ट्रीय ग्राहक दीना निमित्त आयोजित निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत शहरातील श्री. गो. से. हायस्कूल, कै. निर्मलाताई तावरे कन्या माध्यमिक व उच्चमाध्यामिक  विद्यालय, कै. पी. के.शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आदी विद्यालयातील एकूण ३५० विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. त्यातून ९९ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विजेते म्हणून पात्र झाले. त्यातील विविध सहभागी शाळेतील ५२ विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उतेजनार्थ इतर ४८ विद्यार्थी विद्यार्थिनींना सपर्धेत सहभाग घेतल्या बद्दल प्रथम पुरस्कार प्रशस्ती पत्र व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे रुपये १०१ रुपये रोख अशी पारितोषिक वितरीत करण्यात आली. ग्राहक चळवळ कायदा विषयक पुस्तिका म्हणून द्वितीय व तृतीय पुरस्कारात प्रशस्ती पत्र व ग्राहक चळवळ कायदा विषयक अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुस्तिका देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यात चित्रकला स्पर्धेत कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय ची विद्यार्थिनी जागृती मंगलसिग पाटील (प्रथम), अनुष्का नंदकिशोर पाटील (द्वितीय), हर्षदा कैलास पाटील (तृतीय), प्रणिता प्रशांत पाटील (उत्तेजनार्थ), कै. निर्मलाताई तावरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चित्रकला स्पर्धेत संजय प्रवीण महाजन (प्रथम), मयूर बंडू पाटील (द्वितीय), कल्पेश सुदाम पाटील (तृतीय), नम्रता मेहरराव (उत्तेजनार्थ), अक्षदा महेंद्र सोनवणे, चांदनी कुमारी भुदेव, निबंध स्पर्धेत माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयातील योगिता जिभाउ बेंडाले (प्रथम), धनश्री दिलीप पाटील (द्वितीय), भारती मध्चिंद्रनाथ भिल (तृतीय), उत्तेजनार्थ मोहिनी गोपाल जाधव, राजश्री रवींद्र हटकर, उच्च माध्यमिक मिठाबाई विद्यालय कोमल युवराज महाजन (प्रथम), वैष्णवी महेंद्र पाटील (द्वितीय), दीपिका प्रदीप पाटील (तृतीय) तर उत्तेजनार्थ गौरी ईश्वर धनगर, कावेरी सतीश महाजन, वृषाली प्रमोद पाटील, कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयातील जिगिशा नीरज मुणोत (प्रथम), प्राची बाळासाहेब साळुंखे (द्वितीय), जांनवी सोपान महाजन (तृतीय) उच्च माध्यमिक मधील आकांशा मनोज पाटील (प्रथम), कावेरी विजय पाटील (द्वितीय), दिपाली गुणवंत पाटील (तृतीय), उत्तेजनार्थ निकिता गोपाल महाजन, साक्षी ज्ञानेश्वर माळी, वैष्णवी वाल्मीक पाटील व कै. तावरे कन्या माध्यमिक विद्यालयातील टिना कैलास भोई (प्रथम), श्रुती राजेश गायकवाड (प्रथम), टिना बंडू पाटील (द्वितीय), पूजा मधुकर सोनवणे (तृतीय), उत्तेजनार्थ नेहा पोपट पगारे, स्वप्नील विजय पाटील या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. यासर्व विजेत्यांना उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, शिंदे इंटरनॅशनलचे अध्यक्ष पंडित शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदरच्या प्रसंगी आदर्श शिक्षिका अरुणा उदावांद यांचा व शिक्षण समिती प्रमुख सुधाकर पाटील यांना शाल पुष्पहार श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्राहक तीर्थ बंडू जोशी, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पर मनोगतात डॉ. अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य यांनी ग्राहक चळवळी चा मागोवा घेत ग्राहक कायदा व शोषण मुक्त समाज निर्मिती कडे जात असतांना शालेय विद्यार्थ्यां मध्ये ग्राहक जागृती येण्यासाठी व त्या द्वारे सुजाण जागरूक ग्राहक निर्मिती होणे साठी विविध स्पर्धांचे आयोजन व त्यातील विजेत्यांना व इतरांना प्रेरणादायी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याचा आवर्जून उल्लेख केला. प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार कैलास तावडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्याचा गौरव करीत विजेत्यांचे कौतुक केले.

 

 

कार्यक्रमास के. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुखदेव गीते व शिक्षिका सुषमा पाटील, गो. से. हायस्कूलचे कला शिक्षक प्रमोद पाटील, मयुरेश देवरे, तर तावरे कन्या विद्यालयाचे जितेंद्र काळे, मिठाबाई कन्या शाळेच्या उज्वला महाजन, शिंदे इंटरनॅशनल चे मुख्यध्यापक विजय पाटील यांचेसह शिक्षक वृंद कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुषमा पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका संघटक शरद गीते यांनी मानले.

Protected Content