पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रामजन ईदच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस सबस्टेशनमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पोलिसांनी रमजान ईद हा सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.
सोमवार दि. ४ एप्रिल पासुन सुरु होत असलेल्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, अनिल (आबा) येवले, जाकीर खाटीक, मौलाना इक्बाल, रहेमान खान, सईद पंजाबी, अमजद खान, सैय्यद साईल, अजहर खान, शेख इरफान शेख मणियार, शेख आरिफ, शेख रसुल शेख उस्मान, जावेद शेख, मुन्ना पिंजारी सह समाज बांधव उपस्थित होते. बैठकीत पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, मौलाना इक्बाल, शेख रसुल शेख उस्मान यांनी समाज बांधवांनी रमजान ईद हा सण शांततेत साजरा करा असे आवाहन केले.