पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या उपोषणाला देवकरांचा पाठींबा


अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले तापी नदीवरील पाडळसरे धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी धरण संघर्ष समितीतर्फे अमळनेर येथील तहसिल कार्यालयासमोर काल शिवजयंतीपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलन व उपोषणात आज माजीमंत्री तथा जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला.

या धरणामुळे अमळनेर तालुक्यासह धरणगाव तालुक्यातील काही भागातील जनता व शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरण संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. त्यात माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील, संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, जिल्हा बॅक संचालिका सौ. तिलोत्तमाताई पाटील, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, माधुरी पाटील, रंजना देशमुख, रणजित शिंदे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी श्री.देवकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रवक्ते योगेश देसले, डॅक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, विद्यार्थी संघटना अध्यक्ष विजय पाटील हे उपस्थित होते .

Add Comment

Protected Content