डॉ. रंगनाथ जोशी यांना पद्मश्री मणिभाई देसाई पुरस्कार

अमळनेर प्रतिनिधी । तुळजापूर येथील सिध्दमहायोगपीठाधीश्‍वर डॉ. रंगनाथ जोशी यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने नुकतेच गौरवान्वित करण्यात आले.

पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान(एन वाय के क्रीडा, युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार संलग्नित)संस्थेच्या वतीने पद्म श्री डॉ मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०१९ पुरस्कार राज्य राष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी ,निरपेक्षपणे विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या निष्काम कर्मयोग्याना नुकतेच प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे, पद्मश्री विजयकुमार शहा, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ अशोक पाटील, डॉ अण्णासाहेब पाटील, अजिंक्य चौधरी, गोविंदा लोखंडे, सुभाष कट्यारमल सागर फिरके, धनंजय फिरके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रस्ताविक मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे म्हणाले की राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे, निष्काम कर्मयोगी कार्यकर्ते निर्माण होणे, समाजासाठी निरपेक्षपणे, निरंतर कार्य करणारे सेववृत्ती कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी हा उपक्रम असुन राष्ट्रीय एकात्मता ह्यातून निर्माण होते.

यानंतर डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे हस्ते पद्मश्री डॉ विजयकुमार शहा, डॉ रंगनाथ जोशी ह्याना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार मानपत्र व स्मृती चिन्ह ,शाल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात डॉ रंगनाथ नाथराव जोशी (अध्यात्मिक)सिद्धमहायोगपीठाधिस्वर, महाशक्तीपीठ तुळजापूर, डॉ राहुल काळभोर(वैदयकीय, सामाजिक), डॉ सी. एम, अच्युत (वैदयकीय, सामाजिक), डॉ दिलीप लुंकड (वैदयकीय ,सर्जन)पुणे, मारोती व्ही वराडे (उपप्राचार्य नर्सिंग ,वैदयकीय)नागपूर; डॉ भगवंत कुलकर्णी डीन समाजशाश्र विभाग टीएमव्ही पुणे,राजकुमार अण्णा राव जाधव (सामाजिक),सागर अविनाश फिरके(कृषिनिष्ठ शेती, सामाजिक), डॉ मनीषा विनायक खाडे (श्रीरोगतज्ञ,ग्रामीण वैदयकीय सेवा)सासवड, डॉ दशरथ शिंदे (वैदयकीय )दुसर बीड, डॉ धीरज परदेशी (नेत्ररोग तज्ञ)उरुळी कांचन, डॉ विठ्ठल जाधव (लेप्रसि वर्क, चर्मरोगतज्ञ)पुणे,रबारी अमृतभाई गोबरभाई गुजराथ, अमोल महारु बोरसे (पत्रकारिता)पुणे, शरद पुजारी (जेष्ठ पत्रकार दै केसरी)पुणे, सुशांत जगताप (एनटीव्ही) पत्रकार पुणे, विजय केशव कुंभार (शैक्षणिक, सामाजिक)कागल कोल्हापूर, प्रकाश शंकर पाटील, सचिन पंडित महाजनजळगाव, अ‍ॅड जया उभे पिंपरी चिंचवड, वर्षा श्याम ठाकरे रायपूर, मोहन पुराणिक मुंबई, सुशांत घोरपडे सातारा, सुनील उत्तमसा समदूरकर यवतमाल, सतीश दामोदर कट्यार्मल पुणे, दादासाहेब सातव पाटील वाघोली, विलास प्रेमचंद पाटील सांगवी पुणे, रवींद्र रामचंद्र धसाडे पुणे, अशोक खोल्लाम, उषाताई खोल्लाम, सुरेश बर्वे, ठाणे,डॉ अस्मिता देशपांडे नासिक, वृषाली खांदवे,नाशिक, साधना फडनिस पुणे,गणेश कुलकर्णी नगर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Add Comment

Protected Content