चंद्रदर्शन झाल्यामुळे आजपासून रमजान महिन्यास सुरुवात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान मुबारक हे व दुसरे सर्व सण-उत्सव हे चंद्रदर्शनावर अवलंबून असतात. चंद्रदर्शन झाल्यावरच मुस्लिम बांधव आपला कोणताही सण साजरा करतात. यानुसार आज चंद्रदर्शन झाल्याने रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे.

आज शनिवार दि. २ एप्रिल रोजी नमाज – ए – मगरीब संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी स्पष्टपणे चंद्रदर्शन झाल्यामुळे रमजान मुबारक महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून रमजानची विशेष नमाज – ए – तरावीहला तसेच उद्यापासून ‘रोजा’ ला सुरुवात होईल असे आवाहन सून्नी रुयते हिलाल कमिटी व मरकज सून्नी जामा मस्जिद जळगाव तर्फे मौलाना जाबीर रजा, सै. अयाज अली नियाज अली, मौलाना अब्दुल माजिद, मौलाना वासेफ रझा, इकबाल वझीर, मुख्तार शाह, अहेमद ठेकेदार, सिकंदर रझवी, नुर मुहम्मद, शाकीर चित्तलवाला, मौलाना नजमूल हक, मुफ्ती रेहान रझा हे उपस्थित होते.

Protected Content