पाचोरा येथे दिव्यांग सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर

 

पाचोरा, प्रतिनिधी ।जगभरात ३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. याचे औचित्य साधून समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती, चाळीसगावच्या वतीने ३ डिसेंबर ते १० डिसेंबर असा दिव्यांग साप्ताह साजरा करण्यात येत असून या अनुषंगाने पाचोरा येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष्या प्रतिभा मंगेश चव्हाण व स्वयंदिप संस्थेचे अध्यक्ष्या मिनाक्षी निकम यांच्या हस्ते दिव्यांग शिक्षक चित्ते यांना फॉर्म देऊन करण्यात आले.

रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद समावेशित शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक दत्तू पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, थॅलेसेमिया विद्यार्थ्यांना रक्ताची खूप मोठी गरज लागत असून, लॉकडाऊन काळामध्ये या विद्यार्थ्यांना रक्त मिळवण्यास अडचणी निर्माण झाल्या. गेल्या सहा महिन्यापासून थॅलेसेमिया विद्यार्थ्यांना रक्त मिळण्यासाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी थॅलेसेमिया मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करत आहोत त्यातलाच हा एक भाग आहे.

त्यासोबतच मिनाक्षी निकम यांनी सांगितले की , ‘दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत समाज सध्या सकारात्मक विचार करत असून ही खूप आनंदाची बाब आहे’. या उदघाटन सोहळ्या प्रसंगी मंचावर शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष्या प्रतिभा मंगेश चव्हाण, स्वयंदिप संस्थेच्या मिनाक्षी निकम, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, पंचायत समितीचे ओ. एस. गांगुर्डे, मालाजंगम, जिल्हा परिषदेचे समनव्यक दत्तू पाटील, डाएटच्या समन्वयक सुषमा इंगळे या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पंकज रणदिवे यांनी केले. रक्तदान करणार्‍यांमध्ये शिक्षकांसह पंचायत समितीतील कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचारी यांनीही मोठ्या संख्येने रक्तदान केले. पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील यांनीही रक्तदान केले. त्यासोबतच स्वतः दिव्यांग असणारे शंकर चौधरी यांनी व चित्ते यांनी उस्फूर्तपणे स्वतःहून रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जीवन सुरभी ब्लड बँकचे डॉ. भदाणे, हरीश बारगन, प्रियंका जगताप यांनी कामकाज पहिले. सोबतच चाळीसगाव तालुक्यात रक्तदानाचा महासंकल्प राबवणारे पंकज पाटील व भूषण गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिराला पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य यांनी भेट देऊन सदिच्छा दिल्या. या रक्तदान शिबिराचे आयोजन शिक्षण विभागातील पंकज रणदिवे, शाम नेरकर, प्रशांत पाटील, रवींद्र पाटील, वीरेंद्र पाटील, प्रशांत लांबट व सुमन पाटील यांनी केले.

Protected Content