पाचोरा येथील मतिमंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पाचोरा, प्रतिनिधी । येथील संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

माजी मुख्याध्यापिक मिनाक्षी पांडे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पांडे यांच्या हस्ते महिला शिक्षणाच्या प्रथम महिला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. महिला शिक्षणाचा पाया पुण्यातील भिडे वाड्यात उभारतांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना तत्कालीन सामाजिक अडचणींना कसे तोंड द्यावे लागले या विषयीची ऐतिहासिक माहिती देत आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये महिलांचा सहभाग आणि महिलांचे शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे ही दूरदृष्टी ठेवत फुले दाम्पत्यांने महिला शिक्षित करण्यासाठी आयुष्यभर धडपड केली त्यांचे भारतीय समाजावर असणारे हे ऋण कदापि भारतीय समाजाकडून फेडणे शक्य नाही असे याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप पांडे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये उद्गार काढले. फुले दाम्पत्याला महिला शिक्षण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

Protected Content