गोलीणी मार्केटमधून मोबाईल दुकानदाराची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी माकेटसमोरून मोबाईल दुकानदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी २ जानेवारी रोजी लांबविल्याची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जगदीश कैलास पाटील (वय-२७) रा. हनूमान मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी यांचे सुप्रिम कॉलनीत जे.के. मोबाईल नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या बाजूला श्रावणकुमार तेजपाल हे कोरोना काळात मुळ गावी गेल्याने त्यांच्या त्यांची मोपेड (आरजे ४५ एसए ४५०२) क्रमांकाची दुचाकी जगदीश पाटील यांच्याकडे वापरण्यासाठी दिली होती. २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता मोबाईलचे पार्टस घेण्यासाठी गोलाणी मार्केटला आले. दुचाकी पार्किंग करून ते पार्टस घेण्यासाठी मार्केटला गेले. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वस्तू घेवून परत असल्यानंतर जागेवर दुचाकी दिसली नाही. संपुर्ण गोलाणी मार्केट परिसरात त्यांनी दुचाकीचा शोध घेतला परंतू मिळून आली नाही. शहर पोलीस ठाण्यात जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.

Protected Content