गतिमंद विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शालेय साहित्याचे वाटप

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील “भीमा तुझ्या पुण्याईने” ग्रुपतर्फे स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयात पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शालेय साहित्य तसेच महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.

 

यावेळी मुख्याध्यापक संजय राजगुरे यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रुपचे सदस्य, पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी दिपक तायडे यांनी “भिमा तुझ्या पुण्याईने” या  ग्रुपचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी आप्पा बावीस्कर, नितेश घोडे, बापू सोनवणे, राजेश निकम, भैया अहिरे, विशाल खैरनार, दीपक पैठणकर, सागर सोनवणे, राजू सोनवणे, संदीप ब्राह्मणे, टिंकू हेडंगे, प्रवीण खैरे, संतोष सुरवाडे, बंटी निकम, आकाश खेडकर, शत्रुघ्न सोनवणे, रवी मोरे, राहुल सोनवणे, अविनाश जंजाळे, विजय सरदार, विशाल मोरे, संजय अहिरे, उमेश नरवाडे, विक्की कांबळे, संदीप ब्राह्मणे,अतुल मेघे, संदीप मोरे, रितेश ब्राम्हणे, अजय सोनवणे, राकेश अहिरे, नितीन अहिरे तसेच शाळेचे शिक्षक, कर्मचारी आबासाहेब महाले, प्रमोद अमृतकर, राजेंद्र महाजन, जगदीश पाटील, शिवानंद अहिरे, चंद्रकांत अहिरे, गौरव चव्हाण उपस्थित होते.

Protected Content