पाचोरा – भडगाव रोटरी क्लबचे विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील  श्री. संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचालित स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय या विशेष शाळेत विशेष विद्यार्थ्यांना त्यांनीच बनवलेल्या राख्या खरेदी करून बांधण्याचा अनोखी रक्षाबंधनचा सण पाचोरा – भडगाव रोटरी क्लबतर्फे साजरा करण्यात आला.

 

विशेष विद्यार्थ्यांना त्यांनीच बनवलेल्या राख्या खरेदी करून बांधण्याचा अनोखा रक्षाबंधनाचा सण स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी  रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझुनवाला, उपप्रांतपाल डॉ.  विकास पाचपांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, सेक्रेटरी डॉ. गोरखनाथ महाजन, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. पवनसिंग पाटील, रो. डॉ. बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत लोढाया, प्रा. शिवाजी शिंदे व इतर रोटरीचे सदस्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित सर्व मान्यवरांचे विशेष विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी शाळेचे कामकाज नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि परिसरातील फुलबाग, फळबागा तसेच विशेष विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून श्री. संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या माणूस वयाच्या उपक्रमाचे रोटरी क्लबच्या वतीने कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार  शिक्षकांनी मानले.

Protected Content