अनोरे विद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

dharangaon 2

 

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अनोरे येथील कै.बी.जे. महाजन विद्यालयात आज थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.डी. महाजन यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केली. शाळेचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी, बी.आर.महाजन, ए.के.पाटील यांच्यासोबत आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा प्रमुख आर.बी.महाले यांनी केलं व कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.डी.सुतार आणि पी.एन.माळी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content