पाचोरा बसस्थानकात खेडगाव येथील वृध्दाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । लग्नासाठी जात असलेल्या वृध्दाचा थांबलेल्या बसमध्ये हृदय विकाराच्या तिव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना पाचोरा बसस्थानकावर घडली. बस चालकाने थेट बसत ग्रामीण रूग्णालयात नेले मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

अधिक माहिती अशी की, मुळचे खेडगाव ता. चाळीसगाव येथील रहिवासी व हल्ली मुक्काम धामनेर जि. धार (मध्यप्रदेश) येथील ६० वर्षीय वयाच्या वृद्धाचा शिंदाड ता. पाचोरा येथे विवाहास जात असतांना पाचोरा येथील एस. टी. बसस्थाकावर थांबलेल्या बसमधे हृदय विकाराचा जोरदार झटका आला असता बस चालकाने बस थेट ग्रामिण रुग्णालयात नेत वृद्धास वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी वृद्धास मृत घोषित केल्याने बस चालकाच्या प्रयत्नांना अपयश आले. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी ९ वाचेच्या दरम्यान घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हंसराज मोरे हे करीत आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर त्यांचेवर खेडगाव ता. चाळीसगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धामनोर जि. धार (मध्यप्रदेश) येथील मोतीलाल नंदा चौधरी (वय – ६०) हे २८ रोजी अमळनेर येथे हर्षदा पृशोत्तम चौधरी हिच्याकडे आले होते. दरम्यान शिंदाड ता. पाचोरा येथे १ रोजी नातेवाईकाच्या मुलीचा विवाह सोहळा असल्याने मुलगी हर्षादा, पत्नी सुशिलाबाई यांच्यासह सकाळी ६.३० वाजता अमळनेरहून शिंदाड येथे जाण्यासाठी निघाले होते. पाचोरा आगारातून पाचोरा-पिंपळगाव (हरे.) बस (क्रं. एम. एच. १४ बी. टी. १३४९) मध्ये आपल्या कुंटूबासह सकाळी ९ वाजता बसमधे बसल्यानंतर बस सुरू होण्याचे आगोदर मोतीलाल चौधरी यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांना बसचालक एस. व्ही. महाजन व वाहक देशमुख यांनी बस थेट ग्रामीण रुग्णालयात नेत वृद्धास वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मोतीलाल चौधरी यांना मृत घोषित केले. झाला. मयत मोतीलाल चौधरी यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह खेडगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. चौधरी हे गेल्या २० ते २५ वर्षा पासून धामनोर जि. धार (मध्यप्रदेश) येथे उदरनिर्वाहासाठी गेले होते. ते येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्वयंपाकाचे काम करीत होते. त्यांच्या पाच्छात एक मुलगा, एक मुलगी व पत्नी जावाई नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content