पाचोरा पोलिस स्टेशमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

पाचोरा, प्रतिनीधी । येथील पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरिक्षक गणेश चौबे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, पोलिस हेडकाॅन्स्टेबल हंसराज मोरे, पोलिस काॅन्स्टेबल किरण पाटील, किशोर पाटील, बाबासाहेब पगारे, नरेंद्र नरवाडे, मनोज माळी, सुनिल पाटील, मुकुंद परदेशी, दामोदर सोनार, नंदकुमार जगताप, होमगार्ड लक्ष्मण पाटील, अमोल सोनवणे, ललित पाटील, दिपक शिंदे व राहुल पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकत मार्गदर्शन केले.

Protected Content