पाकिस्तानचा झेंडा लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर गावातील एका धार्मिक स्थळावर पाकिस्तान देशाचा झेंडा लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार १८ जानेवारी रोजी समोर आला. यावेळी पोलिसांनी हा झेंडा जप्त करत तो पाकिस्तानचा नसल्याचे सांगितले होते, मात्र यानंतर विश्व हिंदू परिषदेचे हेमंत गुरव यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात धाव घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाने बुधवार, २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

एमआयडीसी हद्दीतील विटनेर गावाजवळ असलेल्या एका दर्ग्याच्या ठिकाणी एक झेंडा लावलेला होता. हा झेंडा पाकिस्तानच्या झेंड्या प्रमाणे असल्याची माहिती १८ जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ता हेमंत गुरव यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी याबाबत विटनेर गावाचे पोलीस पाटील यांना माहिती देवून कारवाईची मागणी केली होती, त्यानुसार ग्रामस्थ आणि पोलीस पाटलांनी घटनास्थळ गाठून हा झेंडा काढून घेतला. तसेच दर्ग्यावरील एका व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर झेंडा लावणाऱ्या गोपाळ कहार याची चौकशी करण्यात आली. बाबा स्वप्नात आले आणि म्हणून मी तो झेंडा लावला. पण तो पाकिस्तानचा झेंडा आहे किंवा तसा दिसणारा झेंडा आहे याची आपल्याला माहिती नाही, असं गोपाळ कहार यानं चौकशीत सांगितलं होतं, मात्र हा झेंडा पाकिस्तानचा झेंडा नसून त्या झेंडयाप्रमाणचे दिसणार झेंडा असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी दिली होती या प्रकरणात कुठलीही कारवाई न झाल्याने विश्व हिंदू परिषदेचे हेमंत गुरव यांनी जळगाव न्यायालयात धाव घेत तक्रार केली होती, या प्रकरणात कामकाज होवून न्यायालयाने बुधवारी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले आहेत, याप्रकरणी न्यायालयात ॲङ केंदार भुसारी व ॲड धनराज झोपे यांनी काम पाहिले.

 

Protected Content