पहूर प्रतिनिधी । इंडियन मेडिकल असोशिएशनतर्फे पहूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी व पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सुद्धा सर्व सामान्य नागरिकांचा सेवा पहूर पोलीस करीत आहे. लॉकडाऊन काळात अतिरिक्त ताण निर्माण झाला असून दरम्यान त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने पहूर पोलीस स्टेशनचे सपोनि राकेशसिंह परदेशी यांच्यासह ३१ पोलीस कर्मचारी आरोग्य तपासणी केली.
आरोग्य तपासणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. स्वप्नील सैतवाल, डॉ. राजेश नाईक, वैद्यकीय अधिक्षक डॉ.हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. अनिकेत लेले यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी जि.प.कृषी सभापती प्रदिप लोढा, मा.पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, अॅड. संजय पाटील, माजी पो.पा. विश्वनाथ वानखेडे उपस्थित होते. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, गोपनीय शाखेचे कर्मचारी जितुसिंग परदेशी, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी डॉक्टरांचे आभार मानले.