पहूर येथे कोरोना योध्दांचा सत्कार; विजय मोरे यांचा उपक्रम

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी)। कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणावर बाधितांची संख्या अधिक प्रमाणावर आहे. पहूर येथील दलित वस्ती सुधार योजनेचे अध्यक्ष विजय पदम मोरे यांनी पहूर ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असलेले वैभव लाठे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत पहूर पेठ व पहूर कसबेचे सर्व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी, पहूर पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी, पहूर पेठ, पहूर कसबे मधील सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर्स, पॅथॅलॉजी लॅब रोजगार, कामगार यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयात तब्बल ९ वर्षे रोजगार म्हणुन काम केलेल्या वैभव लाठे यांचा रूमाल, पेन देवून सत्कार केला. कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून आपले संरक्षण करता यावे विजय मोरे यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी संकट काळात जीवावर उदार होऊन सेवा केलेल्या लोकांचा सत्कार केला. तर वैभव लाठे यानेही पायी प्रवासी येणार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.

Protected Content