डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी यांचे देहावसान

जळगाव प्रतिनिधी । ख्यातनाम साहित्यीक, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत प्रभाकर श्रावण चौधरी (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

जेष्ठ शिक्षणतज्ञ वल्लभदास वालजी वाचनालयाचे माजी अध्यक्ष , व्याख्याते , प्रसिद्ध साहित्यिक , विचारवंत प्राचार्य डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी ( 80 ) यांचे रात्री 9 च्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांनी बाल साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली.त्यांचे जवळपास 65 पुस्तके प्रकाशित झाले आहेत. एक जेष्ठ मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेले असून साहित्य व शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. लेवा गणबोली साहित्य मंडळाचे ते जेष्ठ सल्लागार होते.

Protected Content