पहूर पेठ येथे नागरिकांच्या तक्रारीनंतर नवीन विद्युत रोहित्र कार्यान्वित

 

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । पहूर पेठ वॉर्ड क्र. १ मध्ये वारंवार वीज पुरवठा खाडीत होत असल्याचे त्रस्त नागरिकांनी नवीन विद्युत रोहित्र सुरु करण्याची मागणी केली होती. यामागणीनुसार वीज मंडळाने नवीन रोहित्र बसवून कार्यान्वित केले.

पहूर पेठ येथील वार्ड क्र १ मधील संतोषीमाता ,गोविंद नगर सह परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. या संदर्भात संतोषीमाता नगरातील बेलदार समाज जिल्हा युवा कार्याध्यक्ष प्रविण कुमावत ,श्रावण कुमावत यांच्यासह नागरिकांनी वीज मंडळाला तक्रारींचे निवेदन दिले होते. या भागात नवीन रोहित्र बसविण्याचे काम बरेच दिवासापासून सुरू होते. या तक्रारीची दखल घेत वीज मंडळाने तातडीने काम पूर्ण करून विद्युत रोहित्र कार्यान्वित केले. संतोषीमाता नगरवासीयांनी वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. पहूरपेठ ग्रामपंचायत सरपंच निता पाटील यांनी सुध्दा संतोषीमातानगर , गोविंद नगर भागातील विद्युत पोलवर दोनच तारा असल्याने व त्या लोंबकळता असल्याने तिसरा तार ओढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुन्हा निवेदन दिले आहे. तर पहूर पेठ ग्रामपंचायतीनेही या भागात तीन फेज तार लवकरात लवकर टाकण्यात यावे यासाठी पहूर पेठ ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव केला आहे. या समस्या सुध्दा लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन वीज मंडळाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता व्ही. डी. सोनवणे यांनी दिले.

Protected Content