पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथे अज्ञात चोरटयांनी सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रूपये रोख असे एकूण नव्वद हजार रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पेठ येथील प्रकाश भिकन भोई यांची बहीण ही पहूर पेठ गावात राहते. आज ९ मे २०२० रोजी सकाळी सहा वाजेपुर्वी अज्ञात चोरट्यांनी बहीनीच्या घरातील उघड्या दरवाज्याजवळ घरातून सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, तोंगल,पोत, असे सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रूपये रोख असे एकूण नव्वद हजार रुपये घेऊन पोबारा केला. याबाबत प्रकाश भिकन भोई यांनी पहूर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल अहिरे तपास करीत आहे. गेल्या दोन दिवसांत पहूर येथील ही चोरीची दुसरी घटना असून यामुळे लोक भयभीत झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००