फार्म हाऊस जवळून तरूणाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम शेत शिवारातील बोरोले फार्म हाऊस येवून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक असे की, शुभम गजानन खंडारे (वय-३०) रा. निंभोरा ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम येथील बोरोले फार्म हाऊस येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी ४०९८) ने आला होता. त्यावेळी दुचाकी पार्क करून कामानिमित्त फार्म हाऊस येथे निघून गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्याने पाकींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २८ नोव्हेबर रोजी रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे करीत आहे.

Protected Content