परीक्षा ऑनलाईन घ्या – प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे जिल्हा दौऱ्यावर आले असता प्रहार विद्यार्थी संघटनेच्या भुसावळ तालुकातर्फे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

राज्यात अनेक ठिकाणी ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात आंदोलन करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या देखील केली आहे.परंतु, असे असतांना सरकारने ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतला आहे. यातच उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी ऑफलाईन परीक्षेचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून हा निर्णय कुलगुरूंनी स्वतंत्र स्तरावर घेतले आहेत असे वक्तव्य केले आहे. यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मुलांना ऑफलाईन परीक्षेचा त्रास होत आहे. याकरिता ना. बच्चू कडू यांनी मंत्री व कुलगुरू यांची बैठक बोलवून ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content