भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नवोदय विद्यालयाजवळ गरीब व गरजू रूग्णांच्या सेवेसाठी ट्रामा केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र या रूग्णालयातील एक डॉक्टर, वार्डबाँय व सुरक्षा रक्षकाचे वेतन गेल्या महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कायम कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले असले तरी कंत्राटी सुरक्षा रक्षकाचे वेतन थांबविण्यात आल्याने त्यांच्या वर एक प्रकारे अन्याय होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आधीच भुसावळच्या श्री गाडगेबाबा नगरपालिका रूग्णालयात कायम स्वरूपी डॉक्टर नसल्याने गरीब रूग्णाची गैरसोय होत आहे त्याला पर्याय म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या अथक प्रयत्नाने ट्रामा केअर सेटर सुरु करण्यात आले आहे.

पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटिल यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात उद्घाटन करण्यात आले. मात्र येथील काही कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. अकरा महिन्याच्या कंत्राटावर असलेले एक मेडिकल आँफिसर या पदावरील डॉक्टर व वार्डबाँय हे दोन महिन्यापासून वेतनविना काम करीत आहेत. तसेच कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाहि वेतन नाही.

कोरोना सारख्या महामारीच्या बिकट काळात खाजगी रूग्णालयातील डॉक्टर रूग्णाची तपासणी करीत नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे गरीब व गरजु रूग्णांसाठी ट्रामा केअर रूग्णालय वरदान ठरू पाहत आहे. या रूग्णालयातील डॉक्टर नर्स, वार्डबाँय व इतर कर्मचारी रूग्णाना सेवा देत आहे. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन अदा करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update

 

Protected Content